Gurukul College Chiplun

 IAS आपल्या भेटीला 

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आणि भारतीय प्रशासकीय सेवेच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुणे, दिल्ली याठिकाणी वेगवेगळ्या सुविधा व मान्यवरांचे मार्गदर्शन उपलब्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातून युवक शहरी भागामध्ये येतो. तो थांबवणे त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी करावा लागणारा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावा,  यासाठी IAS आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत दिल्ली, मुंबई अथवा संपूर्ण भारतामध्ये कार्यरत असणारे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन दररोज एक याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

प्रत्यक्ष कार्यरत असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वेगवेगळे अनुभव लोकांना प्रेरणा व प्रोत्साहन तर देतीलच पण त्याचबरोबर युवकांचा प्रशासकीय सेवेमध्ये येण्याचा दृष्टिकोन बदलण्यामध्ये देखील मदत होईल.

उद्योजक आपल्या भेटीला

महाविद्यालयीन युवक ज्यांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावयाचा आहे, त्यांचे उद्योजकीय  कौशल्य वाढीस लागण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चालू असणाऱ्या वेगवे गळ्या संकल्पनांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी,या दृष्टिकोनातून “उद्योजक आपल्या भेटीला” हा उपक्रम राज्यभरामध्ये राबविण्यात येणार आहे.

महाविद्यालयांमध्ये सध्या अस्तित्वात असणाऱ्या ‘उद्योजक विकास विभाग’ त्याच्याशी संलग्न करून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. उद्योजकीय कौशल्य विकास उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या बँकांचे प्रतिनिधी, वेगवेगळ्या प्रशासकीय विभागाचे प्रतिनिधी, वेगवेगळे तज्ञ या अंतर्गत मार्गदर्शन करतील

शुल्क

दिलेल्या दोन्ही अभ्यासक्रमांपैकी कोणताही एक अभ्यासक्रम निवडायचा म्हटला तर त्यासाठी तीन वर्षासाठी नाममात्र शुल्क रु. ३६५ /- इतकेच आकारले जाते.

अतिरिक्त फायदे

तसेच या अभ्यासक्रमांसोबतच विज्ञान, वाणिज्य, कला व तंत्रज्ञान क्षेत्रातील एकूण ५० कोर्सेस सुद्धा उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर दिलेल्या दोन्ही अभ्यासक्रमांपैकी कोणताही एक अभ्यासक्रम निवडल्यास याच शुल्का सोबत विद्यार्थ्यांना एका वर्षामध्ये दिलेल्या ५० कोर्सेस मधील कोणतेही ५ कोर्सेस मोफत करता येतात. १ वर्षासाठी ५ अशाप्रकारे ३ वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना १५ कोर्सेस मोफत करता येतात. या प्रत्येक कोर्से साठी शासनाचे प्रमाणपत्र प्राप्त होते व याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी होतो.

कोर्सेसचा कालावधी

मुख्य अभ्यासक्रम उदा. IAS आपल्या भेटीलाउद्योजक आपल्या भेटीला याचा कालावधी हा जोपर्यंत आपली नोंदणी आहे म्हणजेच ३ वर्षासाठी कायम राहतो व इतर कोर्सेस प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला सुरु होऊन महिन्याच्या अखेरीस त्याची Online पद्धतीने परीक्षा होते.