गुरुकुल महाविद्यालयात करिअर संसद पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न
*चिपळूण, दि. १५ जुलै २०२६ :* महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र (MahaIT) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या *करिअर कट्टा* उपक्रमांतर्गत गुरुकुल महाविद्यालय, चिपळूण येथे *करिअर संसद पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा* जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, संसदीय कार्यपद्धती, सामाजिक कर्तव्य, महाविद्यालयीन जबाबदारी, शिस्तबद्ध वर्तन आणि नेतृत्वगुण विकसित करणे हा आहे. करिअर संसद शपथविधीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जबाबदारी, नियमांचे पालन, सेवाभाव आणि लोकशाही व्यवस्थेतील सहभागाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात शब्दसुमनांनी व राष्ट्रगीताने झाली.करिअर कट्टा समन्वयक प्रा. पूनम गुरव यांनी करिअर कट्टा उपक्रमाची माहिती देऊन विद्यार्थ्यांना या उपक्रमाचे महत्त्व विशद केले.






यानंतर ऑनलाइन माध्यमातून पोलीस उपायुक्त (मुंबई) मा. श्री. मितेश घट्टे सर, सहाय्यक कमांडंट, CRPF (नवी दिल्ली) मा. डॉ. चेतन शेलोटकर सर आणि मा. सोनाली लोहार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना नेतृत्व, सामाजिक जबाबदारी, कौशल्य विकास आणि सार्वजनिक जीवनातील मूल्यांविषयी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. मनोरमा दरेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना संसदीय मूल्यांचे महत्त्व, जबाबदार नागरिक म्हणून भूमिका आणि युवा नेतृत्वाची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. तसेच वर्षभरातील करिअर संसद उपक्रमांसाठी आणि ऑनलाइन प्रशिक्षण शिबिरासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर विद्यार्थ्यांमधून निवडलेल्या मुख्यमंत्री : यश विनय मेहता ,नियोजन मंत्री : सुजल विलास मोहिते, कायदे व शिस्त पालन मंत्री: केतकी कुंदन साळवी सामान्य प्रशासन मंत्री : साक्षी कृष्णा होळकर, माहिती व प्रसारण मंत्री : प्रज्ञा परशुराम सावरटकर, उद्योजकता विकास मंत्री :आकांक्षा संजय लाड,रोजगार स्वयंरोजगार मंत्री : रिद्धी विनायक जाधव ,कौशल्य विकास मंत्री : रसिका संजय राजेशिर्के, संसदीय कामकाज मंत्री : वैष्णवी नितीन सागवेकर ,महिला व बालकल्याण मंत्री पूजा संदीप पांढरे , संसद सदस्य :श्रावणी संतोष पोस्तुरे यांनी शपथ घेतली .
शपथविधीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र, प्रमाणपत्र, बॅज, पुष्प तसेच डायरी प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल आपले अनुभवही व्यक्त केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवता आली. नेतृत्व क्षमता, वक्तृत्वकला, संघभावना, निर्णयक्षमता आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा विकास होण्यास या उपक्रमाची मोलाची मदत झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी करिअर कट्टा टीम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सहभागी विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. मनोरमा दरेकर, करिअर कट्टा समन्वयक प्रा. पूनम गुरव, प्रा. वैशाली भोसले, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.