मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत व्याख्यान आणि सुलेखन स्पर्धा
गुरुकुल महाविद्यालयात ‘महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, चिपळूण’ यांचे सहयोगाने मंगळवार, दि. २३ जानेवारी, २०२४ रोजी दु. १:०० वा. ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ अंतर्गत व्याख्यान आणि सुलेखन स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले.
त्यानिमित्ताने आयोजित ‘सुलेखन स्पर्धा’ या उपक्रमात जवळपास ६२ विद्यार्थी – विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. प्रा. जय सुर्वे सर आणि प्रा. सौ. अंकिता मॅडम यांनी विशेष मेहनत घेऊन हि स्पर्धा यशस्वी केली. योजनाबद्ध नियोजन व नेटकं आयोजन यातून भरभरून प्रतिसाद लाभला; खऱ्या अर्थाने मराठी भाषेचे संवर्धन होते आहे असं जाणवले. सुयोग्य परीक्षण करून प्रा. सौ. अंकिता मॅडम आणि तज्ञांनी तीन क्रमांकांना पारितोषिक प्राप्त यादीत स्थान दिले. त्यांची नांवे –
प्रथम क्रमांक – श्रेया पंकज डाकवे – द्वितीय वर्ष (कॉम्प्युटर सायन्स)
द्वितीय क्रमांक – सुशांत नंदकुमार कांबळे – प्रथम वर्ष (बँकिंग इन्शुरन्स)
तृतीय क्रमांक – सौंदर्या अनिल चव्हाण – द्वितीय वर्ष (बँकिंग इन्शुरन्स)
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, चिपळूणच्या सौ. जोशी मॅडम यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ उपक्रमाचे महत्त्व समजावून सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुर्वे सर यांनी केले आणि मराठी भाषेला वृद्धिंगत करणे का गरजेचे आहे; हे विशद केले.
व्याख्यानात श्री. जठार सर यांनी मराठीला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ मिळावा; यासाठी तिचे विविधांगी उपक्रमांतून संवर्धन हि काळाची गरज आहे; हे बहुवैविध्य मांडणीतून समजावून सांगितले. संयुक्त महाराष्ट्र निर्मिती, मराठी राजभाषा दिन, गौरव दिन, विवेक सिंधू, ज्ञानेश्वरी. .. पासूनची मराठी ची वाटचाल; गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे, स्वा. सावरकर, मोरोपंत, दादासाहेब फाळके, लता मंगेशकर. .. आदी प्रतिभावंताचे योगदान; चित्रपट, नाटक, कथाकथन, परिसंवाद, वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, शब्दकोडी स्पर्धा. .. आदी माध्यमांतून मराठी भाषा कशी समृद्ध झाली; हे सर्वार्थाने श्रोतृवर्गाला ओघवत्या शैलीतून पटवून सांगितले.
या उपक्रमासाठी सौ. जोरवेकर मॅडम, सौ. ज्योती मॅडम, नीलम मॅडम तसेच गुरुकुल महाविद्यालयातील शिक्षकवृंद यांचे विशेष सहकार्य लाभले; सर्वांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले गेले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.