‘राष्ट्रीय मतदार दिन-२०२४’ गुरुकुल महाविद्यालय, चिपळूण येथे साजरा ....
मा. उपविभागीय अधिकारी कार्यालय, चिपळूण यांच्या दि. १९/०१/२०२४ च्या परिपत्रकानुसार २५ जानेवारी, २०२४ रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिन–२०२४’ गुरुकुल महाविद्यालय, चिपळूण येथे सकाळी ११:३० वा. आणि दुपारी ०१:३० वा. साजरा करण्यात आला.
देशातील मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढवा; म्हणून त्यांना जागरुक करण्यासाठी केला जातो. त्या निमित्ताने आपल्या महाविद्यालयातील जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय कार्यात मतदारांसाठीची मराठीतील खालीलप्रमाणे प्रतिज्ञा घेऊन सक्रीय सहभाग नोंदविला.
मतदारांसाठीची प्रतिज्ञा
“आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पवित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभानास बळी न पडता मतदान करू.”
भारतीय निवडणूक आयोगाने १४ वा राष्ट्रीय मतदार दिन – २०२४, नवी दिल्ली येथे अखंड भारताच्या सन्माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय कायदे तथा न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित केला. यावर्षी ‘मतदानाइतके महत्त्वाचे काहीही नाही, मी मतदान करतोच’ ही संकल्पना राबविली गेली.
आपल्या गुरुकुल महाविद्यालयात या दिनासंदर्भात माहिती दिली गेली आणि नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी आवाहन करण्यात आले. तसेच, ‘मतदार दिन आणि ७५ वा प्रजासत्ताक दिन’ याचे औचित्य साधून पोस्टर बनविणे स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यांचे देखील आयोजन शुक्रवार, दि. २६ जानेवारी, २०२४ रोजी स. ९:०० ते ११:०० वा. या वेळेत महाविद्यालय विद्यार्थी – विद्यार्थींनी यांचेसाठी केले आहे.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. पुनम शित्याळकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. सौ. प्रज्ञा मॅडम, प्रा. तमन्ना मॅडम, प्रा. सौ. अमृता मॅडम, प्रा. श्री. निर्मळ सर, प्रा. श्री. सुर्वे सर आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद यांचे विशेष सहकार्य लाभले. अशा पद्धतीने हा मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करणारा राष्ट्रीय कार्यक्रम संपन्न झाला.