दि.०१ ऑगस्ट २०२४ रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे आयोजन
गुरुकुल शिक्षण आणि संशोधन संस्था, चिपळूण संचालित गुरुकुल महाविद्यालय, चिपळूण येथे गुरुवार, दि. १ ऑगस्ट, २०२४ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
गुरुकुल शिक्षण संस्थेचे मा. संस्थापक अध्यक्ष श्री. संजय दरेकर सर यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘लोकमान्य टिळक : १०४ व्या पुण्यतिथी’ हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या सेंटर हेड सौ. मनोरमा दरेकर मॅडम यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.
‘लोकनेतृत्व’ आणि ‘लोकमान्यता’ लाभण्यासाठी व्यक्तीच्या ठायी लोकोत्तर गुणवत्ता असावी लागते. टिळकांना १९१६ च्या जून महिन्यात, पुण्यातील त्यांच्या हिरक महोत्सव समारंभात एक लक्ष रुपयांची थैली अर्पण करण्यात आली ,त्याच व्यासपीठावरून सर्व रक्कम राष्ट्रकार्यासाठी समर्पित करून टिळकांनी सर्वांसमोर आदर्श जागवला इंग्रजांच्या साम्राज्यसत्तेला जबरदस्त हादरा देणारा, मानवाच्या राजकीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असलेला ‘आशिया खंडातील पहिला पुढारी’ म्हणून लोकमान्यांना जग ओळखते. असा राष्ट्रप्रेमी लोकमान्यांच्या कार्य-कर्तृत्वाचा आढावा घेऊन श्री. जठार सर यांनी लोकमान्य टिळक यांच्या शतकोत्तर चतुर्थ पुण्यतिथी वर्षी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
लोकमान्य टिळक पुण्यतिथी’ चे औचित्य साधून आयोजित वक्तृत्व स्पर्धेत सिद्धी दळी, आकांशा यादव, आशिका चिले आणि स्नेहल आग्रे यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धा यशस्वीतेसाठी मार्गदर्शक सौ. पिंपुटकर मॅडम यांनी परीक्षण केले. स्नेहल आग्रे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच मुंबई विद्यापीठीय ‘५७वा युवा महोत्सव’ आयोजित स्पर्धांमधील सहभागी स्पर्धकांनी वादविवाद, वक्तृत्व, तालवाद्य, एकपात्री आदी. .. कलाविष्कार मान्यवरांसमोर सादर करून उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना ‘आपणही कौशल्य विकसित करून विविध स्पर्धा सहभागाचे माध्यमांतून सुप्त गुणांना वाव देऊ शकतो’ हा संदेश दिला. या कार्यक्रमाचे फलक लेखन आणि लोकमान्य टिळक यांचे सुबक रेखाचित्र रेखाटून तृतीय वर्ष वाणिज्य (बँकिंग) मधील साहिल पवार, स्नेहा साळवी, अमित निर्मळ व विघ्नेश महाडिक यांनी उचित अशी सजावट केली. द्वितीय वर्ष वाणिज्य (बँकिंग) मधील दिव्या महाडिक या विद्यार्थिनीने केलेले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वांना आवडले.
सन्माननीय अध्यक्ष श्री. दरेकर सर यांनी लोकमान्य टिळक यांना आदरांजली वाहिली आणि ‘असंतोषाचे जनक’ असलेल्या लोकमान्यांचे विचार, राष्ट्रभक्ती आणि योगदान सांगून स्मृती जागवल्या. ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठ’ यांचे माध्यमातून आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात केली; ह्या आठवणीतून कृतज्ञता व्यक्त केली. आपण महापुरुषांचे विचार अंगीकारावेत; प्रत्येक विद्यार्थ्याने जीवनांत यशस्वी होऊन ‘समाजसेवकांचा जिल्हा’ असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याचा नावलौकिक वृद्धिंगत करावा; ‘गुरुकुल शैक्षणिक संस्था’ आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटीबद्ध आहे असं सांगून सर्व विद्यार्थ्यांना आश्वस्थ केलं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात आपण वावरत असतांना शिक्षणा बरोबरच ‘गुरुकुल’ मध्ये स्कील इंडीया इ. माध्यमांतून कौशल्य विकसित करावीत; याचा आवर्जून उल्लेख करून सरांनी विद्यार्थी वर्गाला आपल्या संबोधनातून योग्य दिशा दिली.
आभारप्रदर्शनपूर्वी सौ. पिंपुटकर मॅडम यांनी शैक्षणिक संस्थेद्वारे लोकमान्य टिळकांना मानवंदना या सद्हेतूने विद्यार्थ्यांकडून “शिक्षण हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी यशस्वीरित्या पूर्ण करणारच” अशी प्रतिज्ञा वदवून घेतली.
या कार्यक्रमाला गुरुकुल महाविद्यालयाच्या मा. प्राचार्या डॉ. सौ. पूनम मॅडम, विद्यापीठ समन्वयक श्री. साखरे सर आणि कबड्डी प्रशिक्षक श्री. विकास पवार सर यांची विशेष उपस्थिती होती. सिनीअर अकाऊंटट श्री. मोहिते सर, सिनीअर प्रा. श्री. निर्मळ सर, नाझीश मॅडम आणि सांस्कृतिक विभाग समन्वयक सौ. राऊत मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सौ. श्रद्धा मॅडम आणि सौ. अंकिता मॅडम यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले. महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी वर्गप्रतिनिधी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. धन्यवाद. ..!
सांस्कृतिक विभाग, गुरुकुल महाविद्यालय, चिपळूण.